Saturday 16 July 2011

"एखाद्या निवांत क्षणी"










 
एखाद्या निवांत क्षणी ..
ढगांकडे ही बघत जा कधी
शॉवर खाली भिजता..
पावूस अनुभवत नाही कधी

एखाद्या निवांत क्षणी ..
वाळली फुलेही बघत जा कधी
शेदूर फासता दगडा..
देव बनत नसतात कधी

एखाद्या निवांत क्षणी ..
विस्कटलेला पटही  बघत जा कधी
सोंगट्या साऱ्या बदलता..
युद्ध जिंकत नाही कधी

एखाद्या निवांत क्षणी ..
विसरल्या वाटा बघत  जा कधी
खुणा साऱ्या विसरता ..
गाव बदलत नाही कधी

एखाद्या निवांत क्षणी ..
आरश्या कडे डोकावत जा कधी
आरसे बघता तोडून
चेहरा बदलत नसतो कधी


राम मोरे/१३.०७.२०११

No comments:

Post a Comment