Follow by Email

Thursday, 28 July 2011

हो भेटू या की


हो भेटू या की....
ती संध्याकाळ मात्र तू शोधून ठेव ...
येताना मी पणाचा अंगरखा काढून ठेवायला विसरू नकोस ..
संस्कृतीच्या घनघोर नियमाचं एक पुस्तक पण आण..
माझा हात तुझ्या हातात असताना ..कुणी पाहिलं तर !! ..स्त्री स्वतंत्र्याचा धडा दाखवता येईल त्यांना ...
माझ्या श्वसात अन तुझ्या श्वासात काहीच कसं अंतर नाही,
ह्याचे पुरावे पण देता येतील ....
मग बघ कसं..मोकळ मोकळ हिंडता येयील आपल्याला ...
पण ती संध्याकाळ मात्र तूच शोधायला हवीस ..
हे मात्र नक्की ..
न विसरायचे ..वचन  तरच देता येयील ...
तो  पर्यंत नेट वरच  भेटत राहू ..बिनधास्त ...

@राम मोरे/२९०७२०११/स.

No comments:

Post a Comment