Follow by Email

Monday, 18 July 2011

" अनकंडीशनल "

by Ram More on Monday, July 18, 2011 at 1:36am

'अनकंडीशनल '


रोज सारखं म्हणत असतेस..
तुझं  माझं घरट   राहील
एक गोंडस असं बाळ  राहील
तू  फक्त काम करत जा
मी घरट्यात राबत जाईल
पण कुठल असं काय ?
खर सांगतो  देवा ..
चुक तुझी बी नाय अन माझी बी नाय
रोज असं कसं घडत  कुणास ठाव ?

सारखं म्हणायचीस
सारे कसे 'अनकंडीशनल' राहील
पावसासाठी तुला ढग देईल
सुवास साठी फुले देईल
जगण्यासाठी श्वास देईल
गावा साठी जमीन देईल
तुझ्यात रुजण्यासाठी  बीज देईल
अंकुरण्यासाठी हवा देईल, पाणी देईल
सावली देयील,प्रकाश देईल
कवितेसाठी शब्द देईल
शब्दांनाही अर्थ देईल
पण कुठल असं काय ?
खर सांगतो  देवा ..
चुक तुझी बी नाय अन माझी बी नाय
रोज असं कसं घडत कुणास ठाव ?

आता सारेकाही जुळून आले तर
आता म्हणते..
काय रे ? सारखा हिंडत असतोस बागेत ?
कधी या फुलाकडे बघ, कधी त्या फुलाकडे
मी असतांना ?
सर्व अशा अटी , अटी, अटी अटी आणि अटी !!
म्हणे सर्व कसं 'अनकंडीशनल' राहील !
पण कुठलं असं काय ?
खर सांगतो  देवा ..
चुक तुझी बी नाय अन माझी बी नाय
रोज असं कसं घडत  कुणास ठाव ?

@राम मोरे/१८.०७.२०११/१.४५

No comments:

Post a Comment