Follow by Email

Monday, 25 July 2011

''तू''

''तू''

श्वास तू विश्वास तू , अंतरीचा दीप तू ,
झुळूक भर वाऱ्याने , कशी विझलीस  तू ?

नभ तू आकाश तू , ग्रीष्मातला पावूस तू ,
झुळूक भर वाऱ्याने , कशी परतलीस  तू ?

स्वप्न तू आभास तू , वेदनेची प्यास तू ,
झुळूक  भर  वाऱ्याने ,कशी शमलीस  तू ?

आकार तू निराकार तू , देहातली मूर्त तू ,
झुळूक  भर  वाऱ्याने ,कशी भंगलीस  तू ?

मद तू मदिरा तू  , नजरेतली झिंग तू ,
झुळूक  भर  वाऱ्याने , कशी विरलीस तू ?

मोह तू मोहिनी तू , मदनाची मंजिरी तू ,
झुळूक  भर  वाऱ्याने , कशी रंगलीस तू ?


@राम मोरे/२६०७२०११/०६२८प.

No comments:

Post a Comment