Follow by Email

Saturday, 30 July 2011

मला कविता शिकायची

 

 

मला कविता शिकायची

by Ram More on Friday, July 29, 2011 at 8:00am
मला कविता शिकायची

ती म्हटली , येताना मी पणाचा अंगरखा  काढून ये....
असे का म्हटलास ?
मी म्हटले त्या शिवाय सूर जुळायचे  नाहीत .....
दाद देते तुला  म्हटली .....
मी मोहरलो ......
एक दोन टिप्स दिल्या कवितेत झुलायच्या .....
कविता जागायच्या .....
म्हटले प्रयत्न कर .....
तुला हि जमेल सारे .....
स्वत:शी अशीच बोलत राहा खूप वेळ .....
धांडोळा करीत रहा ..जन्माचा आयुष्याचा .....
कुठे तरी धागा सापडेल ..दुरवर पोहोचायचा ....
घर सारे सावरायचा ...............
शेवटी मी माझी झोपडी तिला दाखवली .....
शेतातली आई दाखवली ...सुरकुतले हात स्पर्शवले ....
मग मात्र ओथंबली ..थरथरली ....
अलवार हातातून हात सोडवून ....म्हटली ....
मलाही कविता समजली ....
मी पणाचा अंगरखा काढून मी पण येते ....

@राम मोरे /२९०७२०११/संध्या.No comments:

Post a Comment