Follow by Email

Thursday, 4 August 2011

फितूर

 
 
 
 
 
 
 
 
फितूर

रूप तुझे हे पाहण्या ..
मी पण आतुर आहे ..
चुलीशी व्ह्यायला फितूर
मी पण तयार आहे !!

डोळ्यातली आसवे पुसण्या..
मी पण आतुर आहे..
पापण्यावर ओठ ठेवण्या..
मी पण तयार आहे !!

केस तुझे माळन्या ..
मी पण आतुर आहे.
गुलाब तुझ्यासाठी होण्या
मी पण तयार आहे !!

गीत तुझे ऐकण्या ..
मी पण आतुर आहे.
सूर तुझ्या साठी होण्या
मी पण तयार आहे !!

मोर नाचता पाहण्या..
मी पण आतुर आहे..
पैंजण तुझ्या साठी होण्या
मी पण तयार आहे !!

एकरूप तुझ्यात होण्या..
मी पण आतुर आहे..
फितूर आयष्याशी होण्या
आज ही तयार आहे !!

@राम मोरे/०४०८२०११/११५०स.

No comments:

Post a Comment