असशील येत तर स्वप्नांना तिकडेच कुठे ठेवून ये ..
वास्तव जगायचेच असेल हंडा भर आसवे घेवूनच ये !!
@राम मोरे/११०८२०११/१०२०स.
आरशा साठी मी एक प्रतिमा आहे ..
ज्याला दिसेल त्याला प्रतिभा आहे ..
@राम मोरे/११०८२०११/१४१६
आसू सारे जुनेच असतात ..
प्रसंग बघता नवा नवा ..
रूप बदलून येत असतात ..
@राम मोरे/११०८२०११/१००८स..
नाती असती नाती .. असती गवताची पाती
हात लावता प्रेमे .. येती सहजी हाती !!
@राम मोरे/१२०८२०११/८८३७स.
माझ्याच गावात मी अनोळखी .. खुणा साऱ्या पुसल्या ..
नयन तुझे बेईमान दोघे .. आसवाने आसवाला पुसला ..
@राम मोरे /११८२०११/१५३१
आतून येता धुमारा मिलनाला ..
गळा घालती हात भावना ..
हृदयी कशा बघा मिलनाला !!
@राम मोरे/११०८२०११/१५०४
एक होवून
एकात एक असता ..कसला आला दुरावा
आयुष्यभर सारा एक ..श्वास पण पुरावा
@राम मोरे/११०८२०११/१२००