Thursday, 4 August 2011
फितूर
फितूर
रूप तुझे हे पाहण्या ..
मी पण आतुर आहे ..
चुलीशी व्ह्यायला फितूर
मी पण तयार आहे !!
डोळ्यातली आसवे पुसण्या..
मी पण आतुर आहे..
पापण्यावर ओठ ठेवण्या..
मी पण तयार आहे !!
केस तुझे माळन्या ..
मी पण आतुर आहे.
गुलाब तुझ्यासाठी होण्या
मी पण तयार आहे !!
गीत तुझे ऐकण्या ..
मी पण आतुर आहे.
सूर तुझ्या साठी होण्या
मी पण तयार आहे !!
मोर नाचता पाहण्या..
मी पण आतुर आहे..
पैंजण तुझ्या साठी होण्या
मी पण तयार आहे !!
एकरूप तुझ्यात होण्या..
मी पण आतुर आहे..
फितूर आयुष्याशी होण्या
आज ही तयार आहे !!
@राम मोरे/०४०८२०११/११५०स.
Wednesday, 3 August 2011
घर कसं असावं
घर कसं असावं
घर म्हणजे नुसता ..जाहिरातीचा भरणा नसावा ...
बाळाची खेळणी ,वाळवलेली दुपटी ,
दुधाची बाटली,खाण्याची ताटली ,
निर्मळ खळखळनारा झरा असावा !
घर म्हणजे नुसता..Interior चा प्लान नसावा ...
फुललेला सोनचाफा , चिमण्यांचा चिवचिवाट,
दुधावरची साय, मनातली माय ,
सुबक रांगोळीचा अंगण असावा !
घर म्हणजे नुसता..फोटो फ्रेमचा भरणा नसावा ...
खणखणता मोबाईल ,नात्यांचा ''नेट'',
पेटवलेला दिवा , आटवलेला खवा ,
नात्याच्या गावामधला दरवळ असावा !
घर म्हणजे नुसता..फर्निचर चा शोरूम नसावा ...
कुंकवाचा करंडा , हातातल्या बांगड्या ,
केसातला कंगवा, मोगऱ्याचा गजरा ,
वाट पहाणारा आरसा असावा !
@राम मोरे/०४०८२०११/०६४५प.
Tuesday, 2 August 2011
बारा पुढारी
बारा गावचे बारा पुढारी ...
बारा त्यांच्या मती...
भ्रष्टाचाराही पान्हा फुटे ...
साला अशी त्यांची नीती ...
सामन्याला जगण्या आता..
नाही कुठली गती ...
भारत माता रडते आता...
साला अशी त्यांची नीती ...
गरीबा घरच्या लेकराला ...
दुख: ओवी गाती...
गाव सारा रडतो आता ...
बारांच्या त्या बारा नीती ...
@राम मोरे /०३०८२०११/०५२३प.
Monday, 1 August 2011
बायको वरची कविता
बायको वरची कविता
एकदा एका कवीची बायको ...
हट्टाला पेटली बुवा ..
काय बी करा न् एक प्रेमकविता लिवा ..
पण केंद्रस्थानी मलाच ठिवा ..
कवी चक्रावला , गोंधळला .
म्हणला..
हाता मंदी आधी पिशवी ठिवा ..
ती मोहरली ..लाडावली.
पदराशी चाला करत म्हणाली ..
कविता बाहेर जावून लिवनार ?
कवी म्हणला ..
नाही ग बाई ..
भाजीला जायचय शेजारच्या गावा ..
कवी वैतागला, त्रागा कराया लागला..
आता मुलं झाली ..
मुलांना बी मुलं झाली .
आता कसं करू बुवा ..
शेजारणीवरची कविता ..
हिच्यावर कशी काय लिवा ?
@राम मोरे /०२०८२०११/०५५६स.
Subscribe to:
Posts (Atom)





