
बायको वरची कविता
एकदा एका कवीची बायको ...
हट्टाला पेटली बुवा ..
काय बी करा न् एक प्रेमकविता लिवा ..
पण केंद्रस्थानी मलाच ठिवा ..
कवी चक्रावला , गोंधळला .
म्हणला..
हाता मंदी आधी पिशवी ठिवा ..
ती मोहरली ..लाडावली.
पदराशी चाला करत म्हणाली ..
कविता बाहेर जावून लिवनार ?
कवी म्हणला ..
नाही ग बाई ..
भाजीला जायचय शेजारच्या गावा ..
कवी वैतागला, त्रागा कराया लागला..
आता मुलं झाली ..
मुलांना बी मुलं झाली .
आता कसं करू बुवा ..
शेजारणीवरची कविता ..
हिच्यावर कशी काय लिवा ?
@राम मोरे /०२०८२०११/०५५६स.
No comments:
Post a Comment