
खूप दिवस झालेत
खूप दिवस झालेत ,
तुला काही लिहिलंच नाही..
परवाचा पाऊस पाहिला..
कसा बेभान ..
बरसात राहिला..
तू कुठे दिसली नाहीस ..
तो मात्र तुला नि मला ..
उगा शोधत राहिला ..
खूप दिवस झालेत ,
तुला काही लिहिलंच नाही..
परवाकडे..
बाग तुझा पाहिला ..
कळ्यांवर रुसणारा..
भुंगा पाहीला..
तू कुठे दिसली नाहीस ..
तो मात्र तुला नि मला ..
उगा शोधत राहिला ..
राम मोरे/२४०७२०११/०७१४ संध्या
No comments:
Post a Comment