
प्रवास......
आसवांची शपथ राहील,
माणसे नवी , मैफिल नवी ,
वात दिव्याची तेजाळून ठेव जरा ,
प्रवास खूप दूरचा राहील......
दूर पर्यंत रात्र राहील ..
वट वाघळांची वस्ती राहील,
वात दिव्याची तेजाळून ठेव जरा ,
प्रवास खूप दूरचा राहील......
हात हातात असू दे जरा ..
हात सुटण्याचे भय राहील ..
वात दिव्याची तेजाळून ठेव जरा ,
प्रवास खूप दूरचा राहील......
रात्र काही मोठी नाही ,
लवकरच वाटते सरून जाईल,
फुलांचा रस्ता आठव जरा ,
प्रवास जास्त दूरचा नाही !!
ram more/23.07.2011
No comments:
Post a Comment