मित्रांनो, हि आपली ,सर्वांची दुनिया आहे.तुम्ही तुमची असलेली दुख: येथे द्या , मी तुम्हाला फुलांची ओंजळ देईन
आपण सर्व मिळून या नगराचा आनंद घेऊ या !! चला तर मग .........................................................................
Thursday, 21 July 2011
जगणे असे जमलेच नाही !!
जगणे असे जमलेच नाही !!
रोजच रोजची पहाट होते.. रोजच रोजचा दिवस जातो .. स्वतःत डोकावायला वेळच नाही जगणे जगायला वेळच नाही !!
खूप बोलतो, खूप लिहितो.. बरंच काही पहात राहतो .. बोलण्या स्पष्ट येतच नाही .. जगणे जगायला वेळच नाही !!
ती रोजची च येते .. गंध देवून निघून जाते .. तिला शोधायला वेळच नाही जगणे जगायला वेळच नाही !!
आकाश वरती धरणी खाली .. प्रत्येकाची वेगळी कहाणी .. वाचायला कुणा वेळच नाही जगणे जगायला वेळच नाही !!
@राम/२३.०७.२०११/८.२२प
khupach marmik!!!!!!!!!!!!!!!!
ReplyDelete