
कालची मी
कालची मी ती,
आज तीच आहे,
खर सांगते तुम्हाला ....
आरसा बदलला ...
पण..
आजही तीच आहे ...
सुखात मी ....
दुख:त मी ...
ताईत मी ....
आईत मी....
मातीत मी ....
रात्रीत मी ....
प्रतिमेत मी ....
प्रतिभेत मी....
राधेत मी ....
मिरेत मी .....
कालची मी ती ,
आज तीच आहे,
खर सांगते तुम्हाला ....
आरसा बदलला .
पण..
आजही तीच आहे !!
@राम मोरे /२७०९२०११/०७१३स.
No comments:
Post a Comment