Showing posts with label shraddha Nazare. Show all posts
Showing posts with label shraddha Nazare. Show all posts

Wednesday, 27 July 2011

.तो ''देव'' झाला

 












 

तो ''देव'' झाला

बरे झाले तो एकदाचा  वाईट वागून गेला
त्याच्यातला राक्षस तर निघुन  गेला
आता मला त्याची भीती नाही वाटत
कारण
ती आता देव होवून गेला .....












@राम मोरे/२८०७२०११/०७४४स

आरसा

 
 
 
 
 
आरसा
मी तेच बघतोय कधी पासून,
भिंती साऱ्या बघितल्या तपासून ,
तू नाहीस , आरसाही नाही ..
मीच माझ्यात तुला तपासून पाही !!

@राम/२६०७२०११/0808pm

पावूस

 
 
 
पावूस
कालचा पावूस आपला नसतो कधी .
आजचा आहे तो परका नसतो कधी

@राम/२८०७२०११/०६४४स

संध्याकाळ

 
 संध्याकाळ

काल मी एक संध्याकाळ पहिली ,
पहिल्या भागात छानसा सूर्य होता ,
दुसऱ्याभागात कविता होती अन तो होता .....
सांगा बर् , कोण हरवला होता ?

@राम/२७०७२०११/संध्या

विश्व

 
 
 
 
 
विश्व
तेही विश्व हे हि विश्व
काय कुठे फरक असतो ,
हात असला हातात ..
जीव असला जीवात कि ..
काय कुठे फरक असतो ?

@राम मोरे/२७०७२०११/संध्या

उदर भाड्याने देणे आहे ...............

 
उदर भाड्याने देणे आहे ...............

रेडीमेड खाण्याला चव कुठे असते का ?
लिव आणि रिलेशन ला भाव कुठे असतो का ?
वन डे चा खेळ करून 'फेम' कुठे मिळतो का ?
...सरोगेट मदर होवून आईपण मिळते का ?


@राम मोरे/२७०७२०११/संध्या

Tuesday, 26 July 2011

कालची मी

 














कालची मी

कालची मी ती,
आज तीच आहे,
खर सांगते तुम्हाला ....
आरसा बदलला ...
पण..
आजही तीच आहे ...
सुखात मी ....
दुख:त मी  ...
ताईत मी ....
आईत मी....
मातीत मी ....
रात्रीत मी ....
प्रतिमेत मी ....
प्रतिभेत मी....
राधेत मी ....
मिरेत मी .....
कालची मी ती ,


आज तीच आहे,
खर सांगते तुम्हाला ....
आरसा बदलला .
पण..
आजही तीच आहे  !!

@राम मोरे /२७०९२०११/०७१३स.

जगणे असे

 
 
 
 
 
 
 
 
 जगणे असे
रोजचीच, दग दग..रोज तेच ते क्षण ..
या पेक्षा सोपे कोणते..सांगा असते मरण ?

@राम/२३०७२०११/०६५५

Monday, 25 July 2011

वाट



वाट 

वाटच  का त्या दिवसाची   पाहतेस  ?
भरल्या मैफिलीत कुठे  तू  पहातेस  ?
तीच तार .....तीच ...  सतार !!!
साज तोच आवाज तोच....विसरू  का पाहतेस ?

@ram/25072011/1420pm      








                                                                     

खिडकी

खिडकी
वेदनेवर प्रेम करता आयुष्य गेले ,
खिडकीतून डोकावता, उन कुठे आले ?
अजून नाही समजले कुठे काय चुकले !

 @राम/२३०७२०११/०३४५दु
 
 
 
 
 @राम/२३०७२०११/०३४५दु

Sunday, 24 July 2011

गुंफण

 गुंफण
गुंफता हात हाता मध्ये असा गुंतला ,
वेदनेच काटा जसा पायामाजी रुतला !




@ram more/24072011

सोबत

सोबत
हात तुझा हातात , चन्द्र पण हवा...
आपण  दोघेच होतो  ...............
याला  पुरावा  कोणी तरी  हवा  !!



@ram more/24072011

Saturday, 23 July 2011

आगोश



आगोश
मेरी आगोश में तो तू हरदम मह्फुस  रहती है  ,
तू  क्या जाने , तेरी  वफा को संजोये  रखने  ..
मेरी  कितनी हसरतो को,कुर्बानी करनी होती है !!




@राम/२३०७२०११/१०१७ pm

प्रवास...

 






प्रवास......
आसवांची शपथ राहील,
माणसे नवी , मैफिल नवी ,
वात दिव्याची तेजाळून ठेव जरा ,
प्रवास खूप दूरचा राहील......

दूर पर्यंत रात्र राहील ..
वट वाघळांची वस्ती राहील,
वात दिव्याची तेजाळून ठेव जरा ,
प्रवास खूप दूरचा राहील......

हात हातात असू दे जरा ..
हात सुटण्याचे भय राहील ..
वात दिव्याची तेजाळून ठेव जरा ,
प्रवास खूप दूरचा राहील......

रात्र काही मोठी नाही ,
लवकरच वाटते सरून जाईल,
फुलांचा रस्ता आठव जरा ,
प्रवास जास्त दूरचा नाही !!


ram more/23.07.2011

Thursday, 21 July 2011

जगणे असे जमलेच नाही !!

 
 
 
 
 
 
 
जगणे असे जमलेच नाही !!

रोजच रोजची पहाट होते..
रोजच रोजचा दिवस जातो ..
स्वतःत डोकावायला वेळच नाही
जगणे जगायला वेळच नाही !!

खूप बोलतो, खूप लिहितो..
बरंच काही पहात राहतो ..
बोलण्या स्पष्ट येतच नाही ..
जगणे जगायला वेळच नाही !!

ती रोजची च येते ..
गंध देवून निघून जाते ..
तिला शोधायला वेळच नाही
जगणे जगायला वेळच नाही !!

आकाश वरती धरणी खाली ..
प्रत्येकाची वेगळी कहाणी ..
वाचायला कुणा वेळच नाही
जगणे जगायला वेळच नाही !!

@राम/२३.०७.२०११/८.२२प

ओळख

 
 
 
 
 
ओळख

मैफिलीत नव्हते म्हणून ..
मी नाही वेगळी !!
काहीही झाले तरी ..
कहाणी कुठे वेगळी ?

@राम/२१.०७.२०११/३.३५ दु

Tuesday, 19 July 2011

तेरा गम


  





  तेरा गम 

 इतना जादा लगा दिया,
 तेरी बिंदी पर गम है  !!
आईना जरा देख ले ,
इतना कहा  गम है ?
दुनिया सारी  देख ले ,
कितना तेरा कम  है ?

@ राम/१९.०७.२०११/७.३०