Sunday, 31 July 2011

हिंदुस्तान कि कसम








१५ ऑगष्ट..येतोय त्या निमित्ताने ..HINDUSTAN AERONAUTICS LIMITED .,
यांच्या कडून तमाम भारतवासियांसाठी आणि शहीद जवानांसाठी !!
I AM PROUD OF  A  PART OF H .A .L ., NASIK DIVISION ...................................

जबाब देने आवूंगा
हिदुस्तान कि कसम..
न झुकेगा सर वतन का
हर  जवान कि कसम..

जिन्हे प्यार है वतन से
वह जा से खेलते है
ख्वाबो से खेलते है 
अरमासे खेलते है

मिले जो राह में तुफा
तुफा से खेलते है
न झुकेंगे किसी से
हर जवान कि कसम
हिंदुस्तान कि कसम

फिर इन्तेहा न होगा
यु  हि इंतेहन   देंगे
खायेंगे जखम हंस के
खुश हो के जान देंगे

मिट जायेंगे जुबा पे
हम जब  जबाब
है सिने पे शान अपनी 
इसी शान कि कसम
हिंदुस्तान कि कसम

( फिल्म हिंदुस्तान कि कसम )






''आठवण''

 

सखे माझी आठवण तुला त्यावेळी सतावेल ,
आयुष्यातुला निरोप देईल ....
आणि मरण....
तुला स्वीकारणार  नाही ...
..



राम मोरे/३१०७२०११/०६३४सन्ध्य.

Saturday, 30 July 2011

कविता ..















वेदनांचा गाव आख्खा फिरून आलोय
एक एक घावाचा ..
हिशेब देवून आलोय ..
सांज पहिली ..
पहाट पहिली ..
पण ..
ती नाही भेटली ..
कविता ..
बीज रोवणारी ..
अंगणात माझ्या ..
सडा टाकणारी ...
मी येयील .खुशीत ..
जेव्हा येयील ती माझ्या कुशीत !!

@ram/30072011/1210m

मला कविता शिकायची

 

 

मला कविता शिकायची

by Ram More on Friday, July 29, 2011 at 8:00am
मला कविता शिकायची

ती म्हटली , येताना मी पणाचा अंगरखा  काढून ये....
असे का म्हटलास ?
मी म्हटले त्या शिवाय सूर जुळायचे  नाहीत .....
दाद देते तुला  म्हटली .....
मी मोहरलो ......
एक दोन टिप्स दिल्या कवितेत झुलायच्या .....
कविता जागायच्या .....
म्हटले प्रयत्न कर .....
तुला हि जमेल सारे .....
स्वत:शी अशीच बोलत राहा खूप वेळ .....
धांडोळा करीत रहा ..जन्माचा आयुष्याचा .....
कुठे तरी धागा सापडेल ..दुरवर पोहोचायचा ....
घर सारे सावरायचा ...............
शेवटी मी माझी झोपडी तिला दाखवली .....
शेतातली आई दाखवली ...सुरकुतले हात स्पर्शवले ....
मग मात्र ओथंबली ..थरथरली ....
अलवार हातातून हात सोडवून ....म्हटली ....
मलाही कविता समजली ....
मी पणाचा अंगरखा काढून मी पण येते ....

@राम मोरे /२९०७२०११/संध्या.



जमीर

 
जमीर के बाजार में , अमिरो की कोई हैसियत नही होती ...
दिल किसी को देने वाले की, नियत खराब नही होती ...
आयीने तो सभी बेचा करते है, दुनिया के बाजार में ...
अन्धोकी की बस्ती में तो ,उसकी कोई किमत नही होती ...


@राम मोरे/३००७२०११/०८४३स.

अधीर


















मी  तर अधीर होतो .. जकडून हात ठेवायला
माघारलीस तू धुंद गंध..पकडून आत ठेवायला




@राम मोरे/३००७२०११/०९०८स.

Friday, 29 July 2011

किसका का मिलना कब

 










किसका का मिलना कब

सुबह और शाम की क्या बात है ?
उनकी भी क्या फितरत है ?
सुरज आने से  पहले हि आपस में मिल लेते है ..
बाते कर लेते है ..
कौन किसे ,कब मिलता है ..
यह आप को पता नाही ..
बस  आपके लिये.. राज की बात है ..

@ राम मोरे/२९०७२०११/०६३०स.

'खाज्या नाईक ‘एक स्वातंत्र्य सेनानी’

 
खाज्या नाईक ‘एक स्वातंत्र्य सेनानी’   खाज्या नाईक हे १८३१ ते १८५१ पर्यंत ब्रिटीशांच्या नोकरीत होते. ते सेंधवा घाटच्या भागातून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याचे अतिकठीण कार्य करीत. घनदाट जंगलातून जाणाऱ्या बैलगाड्यांचे सौरक्षण करणाऱ्या पोलीस पथकाचे ते प्रमुख होते. त्यांच्या हातातून एक लुटारू मारला गेला व त्या कारणासाठी त्यांच्यावर खटला भरून १० वर्षे सजा देण्यात आली.
 
१८५५ ला शिक्षा भोगून आल्यावर आपल्याला नोकरीत परत घ्यावे आशी विनंती त्यांनी सरकारला केली,परंतु ती बाद झाली पण १८५७ साली वातावरण तापू लागले तसे ब्रिटिशांना खाज्या नाईकांची गरज भासू लागली परंतु आता ते दुसऱ्याच प्रेरणेने भारले गेले होते. ते दिल्लीच्या बादशहाच्या संपर्कात होते व सूचना मिळताच त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यांच्या सोबतीला भीमा नाईक, मेवाश्या नाईक होते, त्यांनी ७००-८०० भिल्लांना जमा करून गावच्या गावे लुटायला सुरुवात केली व ब्रिटिशांना युद्धाचे आवाहन केले तेव्हा त्यांना हनुमंत राव भिल्ल येऊन मिळाला. आजूबाजूच्या खेड्यांमध्ये दहशत निर्माण करून सेंधवा घाटावर काब्ज्जा करून ब्रिटीशांच्या एवजी स्वतः कर वसूल करण्यास सुरुवात केली. 
 
  होळकरांच्या राज्यातून ब्रिटिशांनी गोळा केलेली खंडणी मुंबईला जात होती ती खाज्या नाईकांनी लुटली ती जवळ जवळ ७००००० रुपये होती, व त्याचे रक्षण ३०० सैनिक करीत होते पण त्यांनी खाज्यांना किंवा त्यांच्या कोणत्याही भिल्ल सैनिकाला विरोध केला नाही. एवढा मोठा धक्का ब्रिटिशांना कोणीही दिला नव्हता. ब्रिटीशांचे धाबेच दणाणले व जर खाज्या नाईकांचा बंदोबस्त केला नाही तर सत्ता टिकणार नाही याची त्यांना खात्री पटली. 
 
खाज्या नाईकांच्या दलात आता महादेव नाईक व दौलत नाईक हि येऊन मिळाले, अक्राणी महाल भागात ब्रिटिशांच्या विरुद्दः उभे राहिलेले काळूबाबा नाईक ही आता खाज्यांना येऊन मिळाले त्याच प्रमाणे होळकरांच्या धार संस्थानातील रोहिले, मकरानी व अरब सैन्य ही आता खाज्यांना येऊन मिळाले. आता भिल्ल सेना चोहोबाजूने ब्रिटीशांच्या विरोधात उठली होती, “सुलतानपुरच्या” भिल्ल सेनेने ” सारंगखेडा ” गावावर हल्ला चढविला व ब्रिटिशांना सडो कि पडो करून सोडले. मंदाने गावाचे रुमाल्या नाईक ही ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करत होते.   आता ब्रिटिशांनी उठाव दडपण्या साठी शर्तीचे प्रयत्न सुरु केलेले होते. जिल्ह्यात सैनिकांच्या पलटनी वाढवल्या गेल्या त्याच प्रमाणे अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या नेमनुकीही करण्यात आल्या. व त्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे अधिकार देण्यात आले. एवढेच नाही तर भिल्लांशी लढण्या साठी भिल्लाचेच बांधव असलेले महदेव कोळी जमातीची पलटण तयार करण्यात आली होती. आता भिल्लांना जागोजागी घेराव घातला जात होता व त्यांची ताकद कमी करण्यात येत होती. अश्यातच मेजर ईव्हान्स ला खाज्या व त्याचे ३००० साथीदार हे बडवानी च्या जवळ आम्बापानीच्या जंगलात आश्रयाला असल्याची खबर लागली व त्यांनी भिल्लांना घेराव टाकला. पण जर शरण येतील ते भिल्ल कसले त्यांनी जवळ असलेल्या दगडांच्या व भिल्खीच्या आधारे व काही बंदुकांच्या आधारे लढण्यास सुरुवात केली, परंतु ब्रिटिशांच्या  तैनाती फौजा व अत्याधुनिक बंदुकांपुढे त्यांचा टिकाव लागणे शक्य नव्हते तरीही त्यांनी मोठ्या हिम्मतीने लढाई करून ब्रिटीशांचे दोन अधिकारी व १६ सैनिक मारले.
 
भिल्लांची खूप हानी झाली. ४६० स्त्री व पुरुषांना कैद करण्यात आले. खाज्या नाईक, मेवाश्या नाईक, भाऊ रावल यांच्या बायकांना कैद झाली व खाज्या नाईकांचा मुलगा ” पोलाद्सिंग” हा ‘शहीद’ झाला. पकडलेल्या कैद्यान्पाकी ५५ कैद्यांना जागेवरच गोळ्या घालून मारण्यात आले. आपल्या असंख्य साथीदारांची कत्तल, कुटुंबाची वाताहत पाहूनही खाज्या खचले नव्हते. ते सतत ब्रिटीशांसी लढत राहिले, शेवटी ब्रिटिशांनी त्यांना एकाकी पाडण्यात यश मिळविले व सशर्त माफी मागावी व धुळ्याच्या कल्लेक्टरास शरण यावे म्हणून फर्मान काढले. परंतु त्यांनी सशर्त माफी मागण्यास नकार देऊन संपूर्ण माफी जर देत असाल तर आम्ही शरण येऊ असे उलट उत्तर दिले.
 
हा ब्रिटीशांचा अपमान होता त्यामुळे बोलणे फिसकटले व त्याचा काहीही उपयोग झाला नाही खाज्या नाईकांनी २६/१०/१८५७ ला शिरपूर लुटले व ब्रिटीशांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. त्यांच्या बरोबर फक्त १५० भिल्ल होते. १७/११/१८५७ साली परत खाज्या नाईक व भीमा नाईक यांनी ७००००० चा ब्रिटीशांचा खजिना लुटला.   दिनांक ११ एप्रिल १८५८ रोजी खाज्या नाईक , दौलतसिंग नाईक, काळूबाबा नाईक याच्यासह १५०० भिल्ल सैनिकांना मेजर ईव्हान्सने आम्बापानीच्या जंगलात घेराव घालून हल्ला केला त्याचा बरोबर ब्रिटीशांची मोठी तैनाती फौज व अत्याधुनिक शास्त्रे होती.युद्धात ६५ लोक मारले गेले. खाज्या नाईका साहित ५७ लोकांना ड्रमच्या आवाजावर गोळ्या घालण्यात आल्या व त्यांचे शीर कापून सेन्धाव्याच्या किल्ल्याबाहेर लटकविण्यात  आले, कि पुन्हा जर कोणी उठाव केला तर त्याची हाल असे होतील म्हणून व ४० स्त्रीयांना अटक झाली ही लढाई १८५७ च्या समरातील ” आम्बापानीची लढाई ” म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या लढाईचा उल्लेख कोणत्याही शैक्षणिक पुस्तकात जाणीव पूर्वक टाळल्याचे लक्षात येते, हे फार मोठी शोकांकिका आहे कि आजच्या आदिवासी तरुणाला ” खाज्या नाईकांचे ” नाव ही माहित नाही, त्यांच्या बलिदानाचे महत्व तर खूप दूरची गोष्ट आहे. 
 
      

Thursday, 28 July 2011

हो भेटू या की














हो भेटू या की....
ती संध्याकाळ मात्र तू शोधून ठेव ...
येताना मी पणाचा अंगरखा काढून ठेवायला विसरू नकोस ..
संस्कृतीच्या घनघोर नियमाचं एक पुस्तक पण आण..
माझा हात तुझ्या हातात असताना ..कुणी पाहिलं तर !! ..स्त्री स्वतंत्र्याचा धडा दाखवता येईल त्यांना ...
माझ्या श्वसात अन तुझ्या श्वासात काहीच कसं अंतर नाही,
ह्याचे पुरावे पण देता येतील ....
मग बघ कसं..मोकळ मोकळ हिंडता येयील आपल्याला ...
पण ती संध्याकाळ मात्र तूच शोधायला हवीस ..
हे मात्र नक्की ..
न विसरायचे ..वचन  तरच देता येयील ...
तो  पर्यंत नेट वरच  भेटत राहू ..बिनधास्त ...

@राम मोरे/२९०७२०११/स.

Wednesday, 27 July 2011

.तो ''देव'' झाला

 












 

तो ''देव'' झाला

बरे झाले तो एकदाचा  वाईट वागून गेला
त्याच्यातला राक्षस तर निघुन  गेला
आता मला त्याची भीती नाही वाटत
कारण
ती आता देव होवून गेला .....












@राम मोरे/२८०७२०११/०७४४स

आरसा

 
 
 
 
 
आरसा
मी तेच बघतोय कधी पासून,
भिंती साऱ्या बघितल्या तपासून ,
तू नाहीस , आरसाही नाही ..
मीच माझ्यात तुला तपासून पाही !!

@राम/२६०७२०११/0808pm

पावूस

 
 
 
पावूस
कालचा पावूस आपला नसतो कधी .
आजचा आहे तो परका नसतो कधी

@राम/२८०७२०११/०६४४स

संध्याकाळ

 
 संध्याकाळ

काल मी एक संध्याकाळ पहिली ,
पहिल्या भागात छानसा सूर्य होता ,
दुसऱ्याभागात कविता होती अन तो होता .....
सांगा बर् , कोण हरवला होता ?

@राम/२७०७२०११/संध्या

विश्व

 
 
 
 
 
विश्व
तेही विश्व हे हि विश्व
काय कुठे फरक असतो ,
हात असला हातात ..
जीव असला जीवात कि ..
काय कुठे फरक असतो ?

@राम मोरे/२७०७२०११/संध्या

उदर भाड्याने देणे आहे ...............

 
उदर भाड्याने देणे आहे ...............

रेडीमेड खाण्याला चव कुठे असते का ?
लिव आणि रिलेशन ला भाव कुठे असतो का ?
वन डे चा खेळ करून 'फेम' कुठे मिळतो का ?
...सरोगेट मदर होवून आईपण मिळते का ?


@राम मोरे/२७०७२०११/संध्या

Tuesday, 26 July 2011

कालची मी

 














कालची मी

कालची मी ती,
आज तीच आहे,
खर सांगते तुम्हाला ....
आरसा बदलला ...
पण..
आजही तीच आहे ...
सुखात मी ....
दुख:त मी  ...
ताईत मी ....
आईत मी....
मातीत मी ....
रात्रीत मी ....
प्रतिमेत मी ....
प्रतिभेत मी....
राधेत मी ....
मिरेत मी .....
कालची मी ती ,


आज तीच आहे,
खर सांगते तुम्हाला ....
आरसा बदलला .
पण..
आजही तीच आहे  !!

@राम मोरे /२७०९२०११/०७१३स.

पाठमोरी


 पाठमोरी

निघतांना पाठमोरी उभी तू  राहतेस  ,
रात्रीच्या कहाण्या  पोटभर आठवतेस   !!



@ram more/26072011/0718pm

जगणे असे

 
 
 
 
 
 
 
 
 जगणे असे
रोजचीच, दग दग..रोज तेच ते क्षण ..
या पेक्षा सोपे कोणते..सांगा असते मरण ?

@राम/२३०७२०११/०६५५

Monday, 25 July 2011

''तू''

''तू''

श्वास तू विश्वास तू , अंतरीचा दीप तू ,
झुळूक भर वाऱ्याने , कशी विझलीस  तू ?

नभ तू आकाश तू , ग्रीष्मातला पावूस तू ,
झुळूक भर वाऱ्याने , कशी परतलीस  तू ?

स्वप्न तू आभास तू , वेदनेची प्यास तू ,
झुळूक  भर  वाऱ्याने ,कशी शमलीस  तू ?

आकार तू निराकार तू , देहातली मूर्त तू ,
झुळूक  भर  वाऱ्याने ,कशी भंगलीस  तू ?

मद तू मदिरा तू  , नजरेतली झिंग तू ,
झुळूक  भर  वाऱ्याने , कशी विरलीस तू ?

मोह तू मोहिनी तू , मदनाची मंजिरी तू ,
झुळूक  भर  वाऱ्याने , कशी रंगलीस तू ?


@राम मोरे/२६०७२०११/०६२८प.

'' आईना ''

 







''  आईना ''

तेरी  सुरत  ने  हजारो  को  दिवाना  बना  दिया ..
हम  हि  है , जिन्हे  आपने  आईना  बना  लिया ..!



@ram more/25072011/0800pm

वाट



वाट 

वाटच  का त्या दिवसाची   पाहतेस  ?
भरल्या मैफिलीत कुठे  तू  पहातेस  ?
तीच तार .....तीच ...  सतार !!!
साज तोच आवाज तोच....विसरू  का पाहतेस ?

@ram/25072011/1420pm      








                                                                     

खिडकी

खिडकी
वेदनेवर प्रेम करता आयुष्य गेले ,
खिडकीतून डोकावता, उन कुठे आले ?
अजून नाही समजले कुठे काय चुकले !

 @राम/२३०७२०११/०३४५दु
 
 
 
 
 @राम/२३०७२०११/०३४५दु

Sunday, 24 July 2011

खूप दिवस झालेत


 









खूप दिवस झालेत

खूप दिवस झालेत ,
तुला काही लिहिलंच नाही..
परवाचा पाऊस पाहिला..
कसा बेभान ..
बरसात राहिला..
तू कुठे दिसली नाहीस ..
तो मात्र तुला नि मला ..
उगा शोधत राहिला ..

खूप दिवस झालेत ,
तुला काही लिहिलंच नाही..
परवाकडे..
बाग तुझा पाहिला ..
कळ्यांवर रुसणारा..
भुंगा पाहीला..
तू कुठे दिसली नाहीस ..
तो मात्र तुला नि मला ..
उगा शोधत राहिला .. 


राम मोरे/२४०७२०११/०७१४ संध्या

गुंफण

 गुंफण
गुंफता हात हाता मध्ये असा गुंतला ,
वेदनेच काटा जसा पायामाजी रुतला !




@ram more/24072011

सोबत

सोबत
हात तुझा हातात , चन्द्र पण हवा...
आपण  दोघेच होतो  ...............
याला  पुरावा  कोणी तरी  हवा  !!



@ram more/24072011

Saturday, 23 July 2011

आगोश



आगोश
मेरी आगोश में तो तू हरदम मह्फुस  रहती है  ,
तू  क्या जाने , तेरी  वफा को संजोये  रखने  ..
मेरी  कितनी हसरतो को,कुर्बानी करनी होती है !!




@राम/२३०७२०११/१०१७ pm

प्रवास...

 






प्रवास......
आसवांची शपथ राहील,
माणसे नवी , मैफिल नवी ,
वात दिव्याची तेजाळून ठेव जरा ,
प्रवास खूप दूरचा राहील......

दूर पर्यंत रात्र राहील ..
वट वाघळांची वस्ती राहील,
वात दिव्याची तेजाळून ठेव जरा ,
प्रवास खूप दूरचा राहील......

हात हातात असू दे जरा ..
हात सुटण्याचे भय राहील ..
वात दिव्याची तेजाळून ठेव जरा ,
प्रवास खूप दूरचा राहील......

रात्र काही मोठी नाही ,
लवकरच वाटते सरून जाईल,
फुलांचा रस्ता आठव जरा ,
प्रवास जास्त दूरचा नाही !!


ram more/23.07.2011

Friday, 22 July 2011

प्रवास ....

 








प्रवास ....

आसवांची शपथ राहील ,
माणसे नवी , मैफिल नवी ,
वात दिव्याची तेजाळून ठेव जरा ,
प्रवास खूप दूरचा राहील......


@ram/23.07.2011/6.45am

Thursday, 21 July 2011

जगणे असे जमलेच नाही !!

 
 
 
 
 
 
 
जगणे असे जमलेच नाही !!

रोजच रोजची पहाट होते..
रोजच रोजचा दिवस जातो ..
स्वतःत डोकावायला वेळच नाही
जगणे जगायला वेळच नाही !!

खूप बोलतो, खूप लिहितो..
बरंच काही पहात राहतो ..
बोलण्या स्पष्ट येतच नाही ..
जगणे जगायला वेळच नाही !!

ती रोजची च येते ..
गंध देवून निघून जाते ..
तिला शोधायला वेळच नाही
जगणे जगायला वेळच नाही !!

आकाश वरती धरणी खाली ..
प्रत्येकाची वेगळी कहाणी ..
वाचायला कुणा वेळच नाही
जगणे जगायला वेळच नाही !!

@राम/२३.०७.२०११/८.२२प

ओळख

 
 
 
 
 
ओळख

मैफिलीत नव्हते म्हणून ..
मी नाही वेगळी !!
काहीही झाले तरी ..
कहाणी कुठे वेगळी ?

@राम/२१.०७.२०११/३.३५ दु

Wednesday, 20 July 2011

' फितरत '

' फितरत '

इतना  भी  क्या  सोचना  ,
फितरत  तो  हमारी  अच्छी  थी  ,
दुनिया  चाहे  कु
  भी  कहे ,
तुम  तो  मेरे  लिये  अच्छी  हि  थी  !

@राम /२१.०७.२०११

' मन्नत '

' मन्नत '
मन्नते बहुत सारी मांगी , हमे दफनाने कि ..
वह तो कायल सी हो बैठी, हमारे जनाजे कि !!

@राम

जग














जग

तुला आकाश देईन
आभाळभर प्रकाश देईन
काव भरून ढग देईन
धरणी साठी पाउस देईन
उगवण्यासाठी अंकुर देईन
तुझं माझं एक घरट राहील
घरट्यात एक पिलू राहील
तू चोच धरशील
मी चारा भरवील
मी काम करील
घर सावरील
एक निर्जीव ध्रुव होण्या पेक्षा
एक सदहृदयी सखा होईल !!

@राम/१८.०७.२०११ /१२.४५ रा.

Tuesday, 19 July 2011

तेरा गम


  





  तेरा गम 

 इतना जादा लगा दिया,
 तेरी बिंदी पर गम है  !!
आईना जरा देख ले ,
इतना कहा  गम है ?
दुनिया सारी  देख ले ,
कितना तेरा कम  है ?

@ राम/१९.०७.२०११/७.३०

किती घेशील दोन हातांनी ...........

  हा सूर्य घे , तारे घे ,
विश्वाची अखिल जागा घे ,
हे आभाळ घे, नभ सारे घे,
विशाल सारे क्षितीज घे ,
त्या वरची आभाही घे ,
पण एक काम कर ,
तुझ्या जवळ रहायला ,
थोडी तरी जागा दे ,
बंध आपुले बांधण्या,
वीत भर तरी  धागा दे ,

@राम/१८.०७.२०११/११.३०

Monday, 18 July 2011

" अनकंडीशनल "

by Ram More on Monday, July 18, 2011 at 1:36am

'अनकंडीशनल '


रोज सारखं म्हणत असतेस..
तुझं  माझं घरट   राहील
एक गोंडस असं बाळ  राहील
तू  फक्त काम करत जा
मी घरट्यात राबत जाईल
पण कुठल असं काय ?
खर सांगतो  देवा ..
चुक तुझी बी नाय अन माझी बी नाय
रोज असं कसं घडत  कुणास ठाव ?

सारखं म्हणायचीस
सारे कसे 'अनकंडीशनल' राहील
पावसासाठी तुला ढग देईल
सुवास साठी फुले देईल
जगण्यासाठी श्वास देईल
गावा साठी जमीन देईल
तुझ्यात रुजण्यासाठी  बीज देईल
अंकुरण्यासाठी हवा देईल, पाणी देईल
सावली देयील,प्रकाश देईल
कवितेसाठी शब्द देईल
शब्दांनाही अर्थ देईल
पण कुठल असं काय ?
खर सांगतो  देवा ..
चुक तुझी बी नाय अन माझी बी नाय
रोज असं कसं घडत कुणास ठाव ?

आता सारेकाही जुळून आले तर
आता म्हणते..
काय रे ? सारखा हिंडत असतोस बागेत ?
कधी या फुलाकडे बघ, कधी त्या फुलाकडे
मी असतांना ?
सर्व अशा अटी , अटी, अटी अटी आणि अटी !!
म्हणे सर्व कसं 'अनकंडीशनल' राहील !
पण कुठलं असं काय ?
खर सांगतो  देवा ..
चुक तुझी बी नाय अन माझी बी नाय
रोज असं कसं घडत  कुणास ठाव ?

@राम मोरे/१८.०७.२०११/१.४५













परत ये

मी नाही बोलली तरी,
मला समजून घेणारा तू,
माझ्या वर न बोलता ही,
अबोल प्रीत बरसवनरा तू,
तुझ्या जगात राहूनही ,
माझ्यावर जीव ओवाळून टाकणारा तू,
अजून किती रे तरसवणार,
माझ्यावर पुन्हा मायेची बरसात करायला,
पुन्हा परत कधी येशील रे तू.?.


रिया/१८.०७.२०११

Saturday, 16 July 2011

जिंदगी












जिंदगी

जिंदगी रोज नये रंग में ढल जाती है
कभी दुश्मन तो कभी दोस्त नजर आती है
कभी छा जाये , बरस जाये , घटा भी -मौसम
कभी एक बुंद को भी रूह तरस जाती है 
 
@राम मोरे /१६..०७.२०११ 

मौसम

 
 
 
 
 
आसमान के बादल भी तेरे आंखो जैसे है ' कविता '
कोई मौसम का मोहताज है कोई तेरी यादो का ...........

मंजिल

 
 
  

हर मुश्कील इम्तेहान नही होती
हर मुहब्बत खामोश नही होती
जरा झाक कर देखो , मन्जिलो कि पहचान नही होती 


@ram

काळजी

 
 
  
 
आसवालाही किती समज असते नाही ?
काळजाची काळजी करत विरघळत जाई !!

@राम

''आई''














आज गुरु पौर्णिमा , आई ही आपली प्रथम गुरु , तिला सहस्र प्रणाम
ज्यांना या चित्रा मधून ”आई” समजली ..त्या सर्वांचे आभार !!
आपका धन्यवाद् ..
thanks
شکریہ
…আভার
தங்க உ
આભારી છે


 @राम मोरे 

''द्रौपदी''

 








“द्रौपदी”
आज पुन्हा ..
तुम्ही तिची वस्र फेडून …
तुमच्या वासनेला नागवं केलंत..
ती मात्र निश्चल ,आगतिक उभी …
कुणा कृष्णाच्या जीर्ण  वस्रांची  वाट पाहत ..
वर्षानु वर्षे ती तशीच उभी राहील ..
तुमच्या वासनांची कूस ‘वांझ’ होई पर्यंत !!


राम मोरे/३०.०६.२०११

"एखाद्या निवांत क्षणी"










 
एखाद्या निवांत क्षणी ..
ढगांकडे ही बघत जा कधी
शॉवर खाली भिजता..
पावूस अनुभवत नाही कधी

एखाद्या निवांत क्षणी ..
वाळली फुलेही बघत जा कधी
शेदूर फासता दगडा..
देव बनत नसतात कधी

एखाद्या निवांत क्षणी ..
विस्कटलेला पटही  बघत जा कधी
सोंगट्या साऱ्या बदलता..
युद्ध जिंकत नाही कधी

एखाद्या निवांत क्षणी ..
विसरल्या वाटा बघत  जा कधी
खुणा साऱ्या विसरता ..
गाव बदलत नाही कधी

एखाद्या निवांत क्षणी ..
आरश्या कडे डोकावत जा कधी
आरसे बघता तोडून
चेहरा बदलत नसतो कधी


राम मोरे/१३.०७.२०११

"हमारी याद आयेगी''












हमने हिंदुस्तान की बर्बादिका  हल धुंड लिया है ,
दहशत के  हात में मौत को  थमा दिया है .......
हमे गुजरी  हुई सदिया तो नही पह्चानेगी..
आने वाली सदि  गुजरा कल याद करेगी ....





@ राम मोरे/१७.०७.२०११

Friday, 15 July 2011

मी तिला वाचले







 









मी तिच्या काळजाची सैर केली
पहिला फक्त फुलांचा नजारा..
तुम्ही काय पहिला तर म्हणे
नुसता फक्त अस्थिंचाच  पसारा  



@राम/१६.०७,2011

मुश्कील

हर मुश्कील इम्तेहान नही होती
हर मुहब्बत खामोश नही होती
जरा झाक कर देखो , मन्जिलो कि पहचान नही होती

@राम